भाजप नेत्यांनी त्यांची मनधरणी केली आणि अण्णांनी आंदोलन मागे घेतले. यामुळे तुमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल का असं विचारल्यावर, पत्रकार परिषदेत त्यांच्या शेजारी बसलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चक्क अण्णांना पत्रकार परिषद अर्धवट सोडण्यास सुचवलं. प्रश्न उत्तरं घ्यायलाच नको असं म्हणत देवेंद्र फडणवीस खुर्चीतून उठू लागले, हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.